विदर्भ

मध्यप्रदेशातून गडचिरोलीला अवैध दारू तस्करीसह 37 लाखांचा मुद्देमाल जप्त

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : मध्यप्रदेशातील इन्दोर येथून नागपूर ते चंद्रपूर आणि पुढे गडचिरोलीला होणारी दारू तस्करी पोलिसांनी ताब्‍यात घेतली. तसेच वाहनासह 37 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आयशर क्र. UP 12 BT 9335 या वाहनाने दारूची ही अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग करून ही गाडी पकडली. या गाडीत बॅच नंबर नसलेले 480 बॉक्स देशी दारू किंमत 16,80,000 रुपयांचा मुद्देमाल होता. यासोबतच आयशर् गाडी किंमत 20 लाख असा एकंदर 36 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चालकाजवळ इंदोर येथील सेनीटेक प्रोजेक्ट्स ऋतुराज बिझनेस सेंटरची TP यात प्लम्बिगचा माल असल्याबाबत बनावट व खोटी माहिती आढळून आली. आरोपीने सदर माल इंदोर येथून रिंकू राठी याने भरून दिला व सिरोंचा येथे नेत असल्याचे सांगितले. विकास महेंद्रशिंग वय ४० रा. सैदपूर गजियाबाद (UP) यास अटक करण्यात आली असून पोलीस अधीक्षक नागपूर(ग्रामीण) विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात उप. विभागीय अधिकारी पूजा गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, उपनिरीक्षक आशीष मोरखडे यांच्या पथकाने केली.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT