नागपूर: पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसानंतर आज (दि.२२) दुपारच्या सुमारास पुन्हा नागपुरात जोरदार पाऊस झाला. काही भागात जोरदार वाऱ्यासह गारपीट झाल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांत सुमारे ५० झाडे पडल्याने वीज तारा ठिकठिकाणी तुटल्या आहेत. काही भागात खंडित झालेला वीजपुरवठा अजूनही पूर्ववत झालेला नाही.
दोन दिवसापूर्वीच्या पावसात नागपुरात भिंत कोसळून तर दुसऱ्या घटनेत घरावरील टिन अंगावर पडून अशा प्रकारे चार जणांचा मृत्यू झाला. लग्नसराईचे दिवस असल्याने लॉन्समध्ये लग्न, स्वागत समारंभांना मोठा फटका बसला. शेती, फुले, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पुढील तीन चार दिवस नागपूर, चंद्रपूर, वर्धा, पूर्व विदर्भात आकाश ढगाळ असेल. तसेच वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, 42 अंशावर गेलेला विदर्भातील पारा या आठवड्यात सरासरी तीन चार अंशाने खाली घसरला आहे.
हेही वाचा