व्याघ्र पर्यटनासाठी प्रसिध्द चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र अभयारण्यात वन्यप्राणी प्रगणनेकरीता कर्तव्यावर असताना, काल शनिवारी सकाळी आठच्या सुमारास माया वाघिणीच्या हल्ल्यात वनरक्षक स्वाती ढोमने यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत स्वाती यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत नोकरी देण्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री सचिवालयाच्यावतीने जनसंपर्क कक्षाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पाणवट्यावर वन्यप्राणी प्रगणना होऊ घातलेली आहे. काल शनिवारी ताडोबा व्याघ्र अभयारण्यात कोलारा गेट जवळील कक्ष क्रमांक 97 मध्ये पाणवट्यावर सकाळी आठच्या सुमारास ट्राँझिस्ट लाईन द्वारे आपल्या तीन सहकाऱ्यासह पायी जात असलेल्या वनरक्षक स्वाती एन. ढोमने यांचेवर माया नावाच्या वाघिणीने प्राणघातक हल्ला केला. काही अंतरापर्यंत ओढत नेऊन त्यांचा बळी घेतला. व्याघ्र अभयारण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वनरक्षकावर हल्ला करून जिव घेतल्याची ही थरारक घटना ताडोबात घडली आहे.
हे ही वाचा :