गोंदिया: शेतातील तलावात बुडून युवकाचा मृत्यू File Photo
गोंदिया

गोंदिया: शेतातील तलावात बुडून युवकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : देवरी तालुक्यातील मुरदोली येथे शेती कामासाठी गेलेल्या युवकाचा शेतातील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार ( दि. ५) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. योगेश रोशनलाल सय्याम ( वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. 

मृत योगेश हा शेतीचे काम करण्यासाठी शेतात गेला होता. दरम्यान, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कामे आटोपल्यानंतर जवळच असलेल्या शेत तलावात आंघोळ करण्यासाठी गेला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली. मात्र, रात्र झाल्यामुळे मृतदेहाचा शोध घेता आला नाही.

दरम्यान, आज, रविवार ( दि. ६) सकाळी ८ वाजता गोंदिया येथील रेस्क्यू टीमने योगेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस हवालदार बडोले करीत आहेत. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT