गोंदिया शहरात पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करुन आरोपींना अटक केली  Pudhari Photo
गोंदिया

अवैध शस्त्रे बाळगणारे तिघे जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणूका शांततेत पार पडाव्या, यासाठी गोंदिया ग्रामीण पोलिस व रावणवाडी पोलिस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा पथक व शहर पोलिसांनी छापामार कारवाई केली. यावेळी केलेल्‍या कारवाईत अवैधरित्या शस्त्र बाळगणार्‍या तिघांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली आहे. रोहित प्रमोद शहारे (वय २५), निलेश तेजराम पंधरे (वय २४) व बादल राजेंद्रकुमार मेश्राम (वय २१) अशी तिन्ही आरोपींची नावे आहे.

अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी

पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी याकरिता कडक पावले उचलची आहेत. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्या तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने (दि. १६) स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण व पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीत छापामार कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोवारीटोला येथे रोहित शहारे याच्या घरी धाड टाकून लोखंडी दांडा असलेले चेनव्हील बनावटीचे शस्त्र व चाकू ताब्यात घेतले. तसेच मुरपार येथे कारवाई करीत निलेश पंधरे याला चाकूसह ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे गोंदिया शहर पोलिसांनी ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गौतमनगर येथून बादल मेश्राम यास एका चाकूसह ताब्यात घेतले. तिन्ही आरोपीविरुद्ध अवैध शस्त्र बाळगण्याबद्दल कलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT