गोंदिया येथे रुळावरून घसरलेली मालगाडी Pudhari Photo
गोंदिया

मालगाडीची चाके रुळावरून घसरली

करण शिंदे

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : अप लाईनवरून डाऊन लाईनकडे जाणाऱ्या मालगाडीच्या डब्याची काही चाके रुळावरून घसरल्याची घटना रविवारी (दि. ६) सायंकाळी ४.४५ वाजता घडली. ही घटना गोंदिया रेल्वे स्थानकाजवळ घडली. या घटनेमुळे गोंदिया रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, काही वेळाने चाके रुळावर बसविण्यात आली.

गोंदिया रेल्वस्थानक हे हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील महत्वाचे रेल्वेस्थानक असून दरदिवशी शेकडो माल व प्रवासी रेल्वेगाड्या या रेल्वेस्थानकावरून धावतात. अशातच रविवारी सायंकाळच्या सुमारास गोंदिया स्थानकापासून काही अंतरावरच अप मार्गावरून डाऊन मार्गावर जाणाऱ्या मालगाडीचे अचानक काही चाके रुळावरून घसरली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली.

काही वेळाने घसरलेली चाके रुळांवर बसवण्यात आली. याघटनेमुळे हावडा-मुंबई मार्गावरील प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, गोंदियाहून जबलपूरच्या दिशेने धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या उशिराने धावल्या. दरम्यान, मालगाडीची चाके कोणत्या कारणाने रुळावरून घसरली? याबाबतची चौकशी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT