स्‍थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गांजा जप्त केला Pudhari Photo
गोंदिया

गोंदियात २८ किलो गांजासह ६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया,पुढारी वृत्तसेवा : शहरातील रामनगर परिसरातील रेल्वे मालधक्का परिसरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गांजाची तस्करी करणार्‍याला ताब्यात घेत त्याच्याकडून २८ किलो गांजासह ८ लाख ६८ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सतीश दिनानाथ उपाध्याय ( वय २५, रा. तिलवाराघाट, जि. जबलपूर, म.प्र.) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसी खाक्‍या दाखवताच गुन्हा कबूल

स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलिस नियमित गस्तीवर असताना त्यांना एक व्यक्‍ती दोन बॅगसह संशयास्पद स्थितीत आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपले नाव सांगितले. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता प्लास्टिक चिकटपट्टीचे वेस्टनमध्ये १४ पाकीटात गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा व अन्य साहित्य जप्त करुन आरोपीला अटक करुन त्याला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी त्याचा साथीदार आरोपी भोला प्रकाश यादव ( वय २०, रा. तिलवाराघाट, जि. जबलपूर) फरार असून पोलिस शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT