गोंदिया

गोंदिया : महिलेचा विनयभंग करणार्‍या दोघांना सक्त कारावासाची शिक्षा

स्वालिया न. शिकलगार

गोंदिया- पुढारी वृत्तसेवा : आठ वर्षांपूर्वी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील मनिष कुवरलाल इलपाते (वय २३) राजकुमार देवराम टेकाम (वय १८) या दोन आरोपींना न्यायालयाने गुरुवारी (दि.२) दिलेल्या निकालात दोषी ठरवत दोघाना प्रत्येकी ३ व १ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

सविस्तर माहिती अशी की, २५ ऑगस्ट २०१६ रोजी आरोपी मनिष इलपाते व राजकुमार टेकाम या दोघांनी एका महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणात पिडित महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५६/२०२६ कलम ४४८, ३५४, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले.

दरम्यान, दोन्ही आरोपींना अटक करून तत्कालिन तपासी अधिकारी खुशाल भस्मे यांनी आरोपींच्या विरोधात साक्ष पुरावे गोळा करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, न्यायालय, गोंदिया येथे दोषारोप पत्र सादर केले. या प्रकरणी दोष सिद्ध करण्यासाठी सरकारी वकील प्रणिता संतोष कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. एकंदरीत सरकारी वकिलांचा युक्तिवाद व साक्ष पुराव्यांच्या आधारे आरोपींविरूध्द दोषसिद्ध झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, न्यायालय 3 रे, गोंदिया यांनी दोन्ही आरोपींना भा.द.वि. कलम ४४८, ३५४, ३४, मध्ये दोषी ठरवत आरोपी मनिष इलपाते यास ३ वर्ष सक्त कारावास व ५ हजार रुपये दंड तर आरोपी राजकुमार टेकाम याला १ वर्ष सक्त कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना सक्त कारावास ची शिक्षा ठोठावली आहे. पैरवी कर्मचारी म्हणून सीएमएस सेल चे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक मोटे यांनी कामकाज पाहिले.

SCROLL FOR NEXT