पुजारीटोला धरणाचे आठ दरवाजे उघडले file photo
गोंदिया

पुजारीटोला धरणाचे आठ दरवाजे उघडले

पाणी पातळीत वाढ; सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. रविवार (दि. २२) रात्री ८ वाजताच्या सुमारास धरणाचे ८ वक्रद्वार उघडण्यात आले आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरण नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे गेट सुरू करुन ८ वक्रदवार ०.३० मी ने उघडण्यात आले आहे. यामधून ६४७५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दरम्यान, नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा–गमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी, सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य आहे. त्यातच जलाशयात येणारा येवा पाहून जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असा सतर्कतेचा ईशारा संबंधित विभागाकडून देण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT