गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : गोंदिया -तिरोडा राज्यमार्गावरील एकोडी-बरबसपूरादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. पुलाच्या बांधकामामुळे नाल्यावरुन कच्चा रस्ता तयार करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. मात्र, मंगळवारच्या जोरदार पावसामुळे हा कच्चा पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सोबतच पांगोली नदीवर गिरोला ते सिंधीपारटोला या गावादरम्यान तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्याने या दोन्ही गावांचा आमगाव तालुकास्थळाशी होणारा संपर्क तुटला आहे.
हेही वाचलंत का ?