Dead body found :  Pudhari File Photo
गडचिरोली

Gadchiroli News | तुमरकोठीच्या नाल्यात तरुण मृतदेह आढळल्याने खळबळ

तुमरकोठी-मरकनार मार्गावरील नाल्यात गर्द निळी टी-शर्ट व हाफ पँट घातलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Youth Body Found

गडचिरोली: भामरागड तालुक्यातील तुमरकोठी गावानजीकच्या रस्त्यावरील नाल्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. कोमटी मासू वड्डे (४५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो तुमरकोठी येथील रहिवासी होता. ही घटना गुरूवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली.

आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास तुमरकोठी-मरकनार मार्गावरील नाल्यात गर्द निळी टी-शर्ट व हाफ पँट घातलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तहसीलदार किशोर बागडे यांनीही आपत्ती व्यवस्थापन पथक रवाना केले. कोमटी वड्डे याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळू शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT