सचिन भाऊजी सातपुते Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Farmer Death | चामोर्शी तालुक्यात तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील घटनेने हळहळ

पुढारी वृत्तसेवा

Chamorshi Taluka News

गडचिरोली : अपुऱ्या पावसामुळे पुरेसे उत्पादन न होण्याची शक्यता आणि कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे मंगळवारी (दि.३) घडली. सचिन भाऊजी सातपुते (वय ३६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सचिन सातपुते हे आज सकाळी ८ वाजता शेतावर गेले होते. त्यांनी शेतातील पिकाची पाहणी केली. मात्र, पावसाअभावी हातात काहीच उत्पादन येणार नाही, त्यामुळे शेती कसण्यासाठी बँक, सोसायटी आणि बचत गटाकडून घेतलेले अडीच लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे, ही चिंता त्यांना सतावू लागली. काही वेळाने त्यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. सचिन सातपुते यांच्या पश्चात आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे.

सध्या लोह प्रकल्पांसाठी भेंडाळा परिसरातील सुपीक जमीन अधिग्रहीत करण्याच्या हालचाली शासनाने सुरु केल्या आहेत. या विरोधात तेथील नागरिक वारंवार आंदोलन करीत आहेत. अशा परिस्थितील आर्थिक विवंचनेतूने शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT