युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई येथे अडकलेले बुरेवार कुटुंबीय  
गडचिरोली

US - Iran War | युद्धामुळे गडचिरोलीतील कुटुंब अडकलं दुबईत!

जिल्हा प्रशासनाकडे मदतीची हाक, पर्यटनासाठी गेले होते दुबईला

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली,: इस्त्राईल, इराण व अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे शेकडो लोक विविध देशांमध्ये अडकले असून, गडचिरोलीतील बुरेवार कुटुंबालाही त्याचा फटका बसला आहे. हे कुटुंब सध्या दुबईत अडकलं असून, त्यांनी जिल्हा प्रशासनाला मदतीची हाक दिली आहे.

गडचिरोली येथील सुनील बुरेवार यांचे इंदिरा गांधी चौकात रसिका हॉटेल आहे. २५ फेब्रुवारीला सुनील बुरेवार हे पत्नी मेघा बुरेवार, मुलगा नील आणि मुलगी मयुरा यांच्या समवेत सुट्या घालविण्यासाठी दुबईला गेले. तेथील हॉटेल आवरी देईरा येथे ते वास्तव्यास आहेत.

परंतु इराण-इस्त्राईल-अमेरिका युद्धामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द केली आहेत. दुबईहूनदेखील अशी उड्डाणे रद्द करण्यात करण्यात आली आहेत. युद्धाच्या ताज्या बातम्यांमुळे आम्हाला आमची सुरक्षितता आणि भारतात परतण्याबाबत खूप काळजी वाटते. ५ मार्चला रात्री १२.४५ वाजता इंडिगो फ्लाईटने दुबईहून हैद्राबादमार्गे नागपूरला आमचे नियोजित प्रस्थान आहे. तथापि, सध्याची आपत्कालिन परिस्थिती लक्षात घेता आम्हाला आमच्या प्रवासाच्या योजनेबद्दल अनिश्चितता असून, असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्हाला आवश्यक ती मदत मिळावी, असा संदेश नील बुरेवार यांनी जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य शासनाचा मदत व पुनर्वसन मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT