Gadchiroli Naxal Pamphlets Arrest  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Naxal Pamphlets | पिपली बुर्गी भागात नक्षल पत्रके टाकणाऱ्या दोघांना अटक

एटापल्ली तालुक्यातील खाण कंपन्यांना विरोध करुन ड्रोन सर्वेक्षणावर आक्षेप

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Naxal Pamphlets Arrest

गडचिरोली : काही दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी परिसरात नक्षल बॅनर व पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवा अनिल मिस्त्री (वय २५, रा. तरुणनगर, ता. पाखांजूर (छत्तीसगड) व रोहित रंजित मलिक (वय २५, रा. वटेली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, १२ जुलै २०२६ रोजी पिपली बुर्गी पोलिस ठाण्याच्या हद्दीपासून ५ किलोमीटर अंतरावर जिजावंडी टोला गावाकडे जाणाऱ्या फाट्यापूर्वी दिशादर्शक फलकाला एका लाल रंगाचा कापडी बॅनर बांधण्यात आला होता. शिवाय बाजूला काही पत्रकेही फेकण्यात आली होती. दुसऱ्या ठिकाणीही असेच बॅनर व पत्रके टाकली होती.

या बॅनर व पत्रकांवर नक्षल संघटनेचा उल्लेख करत एटापल्ली तालुक्यातील खाण कंपन्यांना विरोध करुन ड्रोन सर्वेक्षणावर आक्षेप घेण्यात आला होता. शिवाय लोहखाण कंपन्यांना सहकार्य करणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनाही इशारा देण्यात आला होता. पत्रकांवर जेएसडब्लू, ओमसाई नॅचरल, सनफ्लॉवर इत्यादी कंपन्यांचा उल्लेख करुन त्यांना तातडीने काम बंद करा, असा इशारा देण्यात आला होता.

बॅनर व पत्रकांवर नक्षल्यांचा उल्लेख असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती बॅनर व पत्रके टाकणारे इसम शिवा मिस्त्री व रोहित मलिक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT