Kurkheda Sati River Three Children Drowned Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Drowning Accident | आंघोळीला गेलेल्या तीन मुलांचा सती नदीत बुडून मृत्यू

कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Kurkheda Sati River Three Children Drowned

गडचिरोली : आंघोळीला गेलेल्या तीन मुलांचा सती नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे घडली. या घटनेमुळे कुरखेडा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

लक्ष्मण सुन्हेर दुधकंवर(६), कुणाल रमेश दुधकंवर(५) व मोहित हिवराज सराटे(११) अशी मृत मुलांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, खेडेगाव येथील चार मुले आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गावाजवळच्या सती नदीवर आंघोळीसाठी गेले होते.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. चौथ्या मुलाने प्रसंगावधान राखून गावकरी आणि मच्छिमारांना माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार, पोलिस पथक आणि आपत्ती निवारण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले असून, त्यांचा पंचनामा करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले दु:ख

या घटनेबद्दल जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि तलावांची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे कुणीही आंघोळ किंवा पोहण्यासाठी जाऊ नये, तसेच पूल किंवा रस्त्यावरुन पाणी वाहत असताना तेथून मार्गक्रमण करु नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT