Six Children Drowned in Godavari Bodies Recovered
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणा राज्याच्या हद्दीतील गोदावरी नदीत आंघोळ करताना सहा मुले शनिवारी (दि. ७) संध्याकाळी बुडाली होती. आज (दि.८) सकाळी सर्वांचे मृतदेह शोधून काढण्यात पोलिस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला यश आले.
पत्ती मधुसूदन (१५), पत्ती मनोज (१३), कर्नाळा सागर (१४), तोगरी रक्षित (११), पांडू (१८) व राहुल (१९) ही सहा मुले काल गोदीवरी नदीत बुडाली होती. आज सकाळपासून पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आणि मासेमारी करणाऱ्यांच्या साह्याने बोटीद्वारे शोध मोहीम राबवली. त्यानंतर त्यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
सहापैकी चार मुले तेलंगणा राज्यातील आंबटपल्ली, तर दोघे कोरलाकुंडा गावातील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूमुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.