निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित १०८ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस file photo
गडचिरोली

निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित १०८ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Maharashtra assembly poll| खुलासा समाधानकारक न वाटल्यास प्रशासकीय कारवाई

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या १०८ कर्मचाऱ्यांना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

गडचिरोली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २६ व २७ ऑक्टोंबर रोजी मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणासाठी गडचिरोली,धानोरा आणि चामोर्शी तालुक्यातील १ हजार ८१९ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. यात केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परंतु वेगवेगळी कारणे दाखवून काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज केला. या प्रशिक्षणाला १०८ कर्मचारी अनाधिकृतपणे गैरहजर राहिले. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्याकडून तत्काळ खुलासा मागविण्यात आला आहे.(Maharashtra assembly poll)

प्राप्त झालेला खुलासा उचित व समाधानकारक न वाटल्यास गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अन्वये प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशी माहिती गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT