गडचिरोलीतील ७ पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर (Pudhari Photo)
गडचिरोली

President's Gallantry Medal | नक्षल्यांविरुद्ध शौर्याने लढणाऱ्या गडचिरोलीतील ७ पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर

Gadchiroli Police | पाच वर्षांत गडचिरोली पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना ३ शौर्यच्रक, २१० पोलिस शौर्यपदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ८ जणांना पदक प्राप्त

पुढारी वृत्तसेवा

Independence Day 2025

गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने नक्षल्यांविरुद्ध शौर्याने लढणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातील ७ अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर केले आहे.

सहायक पोलिस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर, सहायक फौजदार मनोहर कोतला महाका, हवालदार मनोहर लचमा पेंदाम, पोलिस शिपाई प्रकाश ईश्वर कन्नाके, अतुल सत्यनारायण येगोलपवार, हिदायत सदुल्ला खान व शहीद पोलिस शिपाई सुरेश लिंगाजी तेलामी(मरणोत्तर) अशी शौर्यपदक जाहीर झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

२०१७ मध्ये भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाण्यातून सी-६० पथकाचे जवाना भामरागडकडे परत जात असताना नक्षल्यांनी भुसुरुंगस्फोट घडवून पोलिसांवर हल्ला केला होता. यावेळी पोलिसांनी धैर्याने नक्षल्यांचा प्रतिकार करुन स्वत:चे संरक्षण केले. या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

मागील पाच वर्षांत गडचिरोली पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना ३ शौर्य च्रक, २१० पोलिस शौर्यपदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ८ जणांना पदक प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT