गडचिरोली

छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी केले नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त

दिनेश चोरगे

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात कोरची तालुक्यातील भिमनखोजी गावानजीकच्या जंगलात शुक्रवारी (दि.७) गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उदध्‌वस्त केले.

भिमनखोजी जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षली एकत्र आले होते. ही माहिती मिळताच गुरुवारी संध्याकाळी अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात सी-६० पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविले. पोलिसांचा दवाब पाहून नक्षली पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन पिट्टू, औषध, पुस्तके आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले, याची पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT