नागपूर - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला ठिकठिकाणी काहीसे हिंसक वळण लागले.
गडचिरोली जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलनामुळे अनेक वाहनांचा खोळंबा झाला. दुसरीकडे प्रहार च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नागपूर अमरावती महामार्गावर गोंडखैरी येथे चक्का जाम आंदोलन पुकारले. दरम्यान वाहनाची जाळपोळ करण्यात आल्याने वातावरण तापले. रजनीकांत अतकरी आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. एक शववाहिनी वाहन जाळण्यात आले. हे वाहन रजनीकांत अतकरी यांच्याच मालकीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आंदोलनामुळे काही काळ अमरावती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.