गडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या गट व गणनिहाय आरक्षणाची सोडत आज नियोजन भवनात संध्याकाळी काढण्यात आली. ५१ सदस्यीय जिल्हा परिषदेत ५० टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव असल्याने अनेक दिग्गजांची पंचाईत झाल्याचे दिसून येत आहे.
आज उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव व नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या ५१ व पंचायत समित्यांच्या १०२ जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यानुसार कोरची तालुक्यातील कोरची-बिहिटेकला-अनुसूचित जमाती(महिला), बेळगाव-कोटगूल- अनुसूचित जमाती(सर्वसाधारण), कुरखेडा तालुक्यातील पलसगड-पुराडा-अनुसूचित जमाती(सर्वसाधारण), तळेगाव-वडेगाव-अनुसूचित जमाती(सर्वसाधारण), गेवर्धा-गोठणगाव-नामाप्र(महिला), कढोली-सावलखेडा-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), अंगारा-येंगलखेडा-अनुसूचित जमाती (महिला), देसाईगंज तालुक्यातील कोरेंगाव-डोंगरगाव-नामाप्र (सर्वसाधारण), विसोरा-सावंगी-नामाप्र (महिला), कुरुड-कोकडी-खुला प्रवर्ग, आरमोरी तालुक्यातील वैरागड-मानापूर-अनुसूचित जमाती (महिला), पळसगाव-जोगीसाखरा-नामाप्र (सर्वसाधारण), ठाणेगाव-इंजेवारी-खुला प्रवर्ग (सर्वसाधारण),
सिर्सी-वडधा-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), धानोरा तालुक्यातील मुस्का-मुरुमगाव-अनुसूचित जमाती (महिला), येरकड-रांगी-अनुसूचित जमाती (महिला), चातगाव-कारवाफा-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), पेंढरी-गट्टा-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी-नामाप्र (सर्वसाधारण),वसा-पोर्ला-नामाप्र (महिला), कोटगूल-मुरखळा-अनुसूचित जाती (सर्वसाधारण), जेप्रा-विहीरगाव-नामाप्र (सर्वसाधारण), मुडझा-येवली-नामाप्र (महिला), चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै-तळोधी-खुला प्रवर्ग(महिला), विसापूर रै-कुरुड-खुला प्रवर्ग (महिला), विक्रमपूर-फराडा-नामाप्र (महिला), भेंडाळा-मुरखळा-नामाप्र (सर्वसाधारण), लखमापूर बोरी-गणपूर रै-नामाप्र (सर्वसाधारण), हळदवाही-रेगडी-खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), घोट-सुभाषग्राम-खुला प्रवर्ग(महिला), दुर्गापूर-वायगाव-खुला प्रवर्ग (महिला), आष्टी-इल्लूर-खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), मुलचेरा तालुक्यातील कालीनगर-विवेकानंदपूर-नामाप्र (महिला), सुंदरनगर-गोमणी-खुला प्रवर्ग (महिला), कोठारी-शांतीग्राम-नामाप्र (महिला), एटापल्ली तालुक्यातील जारावंडी-कसनसूर-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) ,गट्टा-हेडरी- अनुसूचित जमाती (सर्वसाधारण),
गेदा-हालेवारा-अनुसूचित जमाती (महिला), पंदेवाही-बुर्गी-अनुसूचित जमाती (महिला), भामरागड तालुक्यातील आरेवाडा-लाहेरी-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण),कोठी-येचली- अनुसूचित जमाती (महिला), अहेरी तालुक्यातील खमनचेरु-नागेपल्ली- अनुसूचित जमाती (महिला), वेलगूर-आलापल्ली-खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), महागाव-देवलमरी-अनुसूचित जमाती (सर्वसाधारण), पेरमिली-राजाराम- अनुसूचित जमाती (महिला), रेपनपल्ली-उमानूर-अनुसूचित जाती (सर्वसाधारण), जिमलगठ्ठा-पेठा- अनुसूचित जमाती (महिला), सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-असरअली-खुला प्रवर्ग (सर्वसाधारण), विठ्ठलरावपेठा माल-जाफ्राबाद चेक-अनुसूचित जाती (महिला), नारायणपूर-जानमपल्ली-अनुसूचित जाती (महिला), लक्ष्मीदेवीपेठा-अंकिसा माल-अनुसूचित जाती (महिला)
अनेकांचा हिरमोड, काहींना सुरक्षितता
आजच्या सोडतीनुसार, जिल्हा परिषदेच्या राजकारणातील दिग्गज काँग्रेस नेते बंडोपंत मल्लेलवार, राष्ट्रवादीचे नेते जगन्नाथ बोरकुटे, डॉ.तामदेव दुधबळे, रा्ष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार, माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी अध्यक्ष तथा भाजप नेत्या योगिता भांडेकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे आदींना सुरक्षित मतदारसंघ निवडणे सोपे झाले आहे. मात्र, काँग्रेस नेते तथा माजी उपाध्यक्ष जीवन नाट, रा्ष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नाना नाकाडे, शिवसेना शिंदे गटाचे नेते सुरेंद्रसिंह चंदेल, माजी बांधकाम सभापती छाया कुंभारे, भाजप नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार आदींची पंचाईत झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवा नेत्या तनुश्री आत्राम यांना त्यांच्या गृह तालुक्यातच सुरक्षित मतदारसंघ मिळाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल. काँग्रेसचे युवा नेते प्रमोद भगत तसेच बानय्या जनगाम यांचेही मतदारसंघ शाबूत राहिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद कात्रटवार यांनाही गडचिरोली तालुक्यात सुरक्षित मतदारसंघ सापडल्याने ते निवडणुकीत रंगत वाढवणार आहेत.