Gadchiroli lightning strike death Pudhari
गडचिरोली

Gadchiroli lightning strike death: रामगड येथे वीज कोसळून युवकाचा मृत्यू

कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे अंगावर वीज कोसळल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.5) सकाळी घडली

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे अंगावर वीज कोसळल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.5) सकाळी घडली. दिशांत रेवाराम सतीमेश्राम (वय १७, रा. मुरमाडी/पारडी, ता. लाखांदूर, जि. भंडारा) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिशांत रामगड येथील एका गणेश डेकोरेशनमध्ये काम करत होता. आज सकाळी एका लग्न समारंभासाठी मंडप आच्छादन व विद्युत फिटिंगचे काम करत असताना अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

याच दरम्यान दिशांतच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दिशांतच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समजताच रामगड तसेच त्याचे मूळ गाव मुरमाडी येथे शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT