Vairagad Fort Well Incident Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | वैरागड किल्ल्याच्या विहिरीत पडून पहारेकऱ्याचा मृत्यू

आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील ऐतिहासिक विराट किल्लयाच्या विहिरीत पडून पहारेकऱ्याचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Vairagad Fort Well Incident

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील ऐतिहासिक विराट किल्लयाच्या विहिरीत पडून पहारेकऱ्याचा मृत्यू झाला. सोनू माधव पिठाले (वय ३२, रा.वैरागड) असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

सोनू पिठाले हे मागील पाच वर्षापासून पुरातत्व विभागामार्फत वैरागड येथील किल्ल्यावर पहारेकरी म्हणून कार्यरत होते. किल्ल्याच्या देखभालीची जबाबदारी ते पार पाडत होते. सोमवारी सकाळी किल्ल्यावर असताना विहिरीजवळून जाताना अचानक तोल गेल्याने ते विहिरीत पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला. सोनू पिठाले हे अविवाहित होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंब आणि गावावर शोककळा पसरली आहे. आरमोरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT