Vaccination Centers Remote Gadchiroli Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Pulse Polio Vaccination : गडचिरोलीच्या दुर्गम भागात २,३०८ लसीकरण केंद्रे, १२३ ट्रान्झिट पथके, ९८ मोबाईल पथके

८२ हजार ९८४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

Vaccination Centers Remote Gadchiroli

गडचिरोली : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, २८ जून रोजी जिल्हाभर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील ८२ हजार ९८४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पल्स पोलिस मोहीम राबविण्यासाठी जिल्ह्यात २,३०८ लसीकरण केंद्रे, १२३ ट्रान्झिट पथके आणि ९८ मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने सुक्ष्म नियोजन केले आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी गावागावांत लसीकरणाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सर्व पालकांना रविवारी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओचा डोस देण्याचे आवाहन केले आहे. पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT