NQAS Accreditation Gadchiroli AI Photo
गडचिरोली

Gadchiroli News | NQAS मूल्यांकनात गडचिरोलीची उल्लेखनीय कामगिरी; ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन

अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय आणि ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण ११ आरोग्य संस्थांना मानांकन प्राप्त

पुढारी वृत्तसेवा

NQAS Accreditation Gadchiroli

गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळविले आहे. राज्य कौटुंबिक कल्याण ब्युरो, पुणे यांच्या मूल्यांकनात जिल्ह्यातील अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय आणि ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय NQAS मानांकन प्राप्त झाले आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या यशाबद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन करत राष्ट्रीय मानांकनासाठीही प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

NQAS अंतर्गत सेवा, रुग्णांचे हक्क, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, गुणवत्ता व्यवस्थापन आणि रुग्ण समाधान अशा आठ निकषांवर मूल्यांकन केले जाते. उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाले असून, आता सर्व ११ संस्था राष्ट्रीय मानांकनासाठी अर्ज करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT