प्रशांत बोस 
गडचिरोली

Gadchiroli News | माओवाद्यांचा पॉलिट ब्यूरो सदस्य प्रशांत बोसचे 80 व्या वर्षी निधन

माओवादी कम्युनिस्ट पक्ष आणि एकूणच नक्षल चळवळीला वैचारिक दिशा देणारा नेता

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली, : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिट ब्यूरो सदस्य तथा बिहार व झारखंडचा प्रभारी प्रशांत बोस याने आज सकाळी वयाच्या ८० व्या वर्षी रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये अखेरचा श्वास घेतला. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

माओवादी कम्युनिस्ट पक्ष आणि एकूणच नक्षल चळवळीला वैचारिक दिशा देणारा नेता अशी ओळख असलेल्या प्रशांत बोस हा १९६७ च्या सुमारास कामगार युनियनचा कार्यकर्ता म्हणून नक्षल चळवळीत सहभागी झाला. निर्भय मुखर्जी, किशनदा, महेश, काजल अशी टोपण नावे वापरून प्रशांत बोस याने नक्षल चळवळीत काम केले. प्रशांत आणि माओवादी कम्युनिस्ट पक्षाची सदस्य असलेली त्याची पत्नी शीला मरांडी यांना त्यांच्या अन्य चार सहका-यांसह झारखंड पोलिसांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात होते.

मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये भरती करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान प्रशांतने प्राण सोडला. प्रशांत बोस हा पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड राज्यातही सक्रिय होता. देशातील अनेक बड्या माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केले असताना आणि माओवादी चळवळ देशातून ३१ मार्च अखेर संपुष्टात आल्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशांत बोस याचे निधन शिल्लक राहिलेल्या माओवाद्यांसाठी धक्कादायक ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT