Dead body found in Gadchiroli Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Crime | कोरचीत खळबळ: जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह

कोरची तालुक्यातील कोटरा ते बोगाटोला रस्त्यालगतच्या गावतलावाजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

Dead body found in Gadchiroli

गडचिरोली : कोरची तालुक्यातील कोटरा ते बोगाटोला रस्त्यालगतच्या गावतलावाजवळ एका अनोळखी युवकाचा मृतदेह जमिनीत अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोरची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(ता.२) कोटरा-बोगाटोला मार्गावरील तलावाजवळ एका खड्ड्यात अर्धवट गाडलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळला. खोल खड्डा करुन मृतदेह न पुरल्याने माती अस्ताव्यस्त्‍ झाली. त्यामुळे मृतदेहाचा काही भाग दिसू लागला.

याबाबत मुलेटिपदीकस गावचे पोलिस पाटील ईश्वरदास कल्लो यांनी कोरची पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर कोरचीचे सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी गावकऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा मृतदेहाचा काही भाग बाहेर आल्याचे दिसून आले. मृत इसम २५ ते ३५ वयोगटातील असून, तो पॅन्ट व शर्ट परिधान केलेला होता. त्याच्या दोन्ही हातात कडे होते. चेहरा पूर्णपणे काळा पडून, मृतदेह आठ ते दहा दिवसांपासून पुरलेला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल करत या घटनेचा तपास सुरू केला आहे.

अवैध व्यवसायातून हत्या झाली नाही ना?

कोरची तालुक्यात गोवंश व सागवान लाकडांची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते. शिवाय कोटरा, बोटेकसा, मसेली, कोलाटोला, कोटगूल, अंतरगाव परिसरात कॅसिनो क्लब चालवले जातात. या क्लबमध्ये शहरातील धनाढ्य लोक येत असतात. त्यांच्यासाठी दारु व मटनची व्यवस्था केली जाते. यातून अनेकदा वादही होत असतात. अशा वादातूनच संबंधित व्यक्तीची हत्या झाली नसावी ना, याविषयी चर्चा सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT