रामसागर येथे धाड टाकून संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांसह ३५ हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला.  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | रामसागर येथे भरारी पथकाची धाड: एचटीबीटी कापूस बियाण्यांसह ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती

पुढारी वृत्तसेवा

Ramsagar raid, HTBT cotton seeds seizure

गडचिरोली : कृषी विभागाच्या भरारी पथकाने चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे धाड टाकून संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांसह ३५ हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला.

रामसागर येथे कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाड टाकली. या कारवाईत संशयित कापूस बियाण्यांची ३७ पाकिटे, सीलिंग मशीन तसेच कोरी पाकिटे असा एकूण ३५ हजार ४३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या बियाण्यांमध्ये पुष्पा, बलवान व मालामाल या वाणांची बियाणे आढळून आले.

या प्रकरणी कृषी अधिकारी चेतन चलकलवार यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर देवेंद्र सदाशिव वन्नेवार, रा. रामसागर यांच्या विरोधात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहीम अधिकारी आनंद पाल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, कृषी अधिकारी चेतन चलकलवार तसेच सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. बनसोडे आणि अंमलदार राहुल रामटेके आदींनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT