गडचिरोली

Gadchiroli Flood : राजस्थान येथे बँक व्यवस्थापकपदी रुजू होण्यासाठी निघालेला उमेदवार अडकला पुरात, आपत्ती व्यवस्थापन टिमने केली सुटका!

एका परीक्षार्थीसह आजारी व्यक्तींचीही पुरातून सुखरुप सुटका करण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली तालुक्यातील कुंभी येथे आलेल्या पुरामुळे नोकरीसाठी रुजू होण्यासाठी धडपणारे बँक व्यवस्थापक, परीक्षार्थी आणि आजारी व्यक्तीस आपत्ती व्यवस्थापन चमूने सुखरुप बाहेर काढले.

कुंभी येथील समीर विजय गेडाम (२५) यांची राजस्थान येथे बँक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली असून, रुजू होण्यासाठी त्यांना तातडीने प्रवास करणे आवश्यक होते. तसेच तुलसी नवबोध गेडाम (२१) हिची नागपूर येथे परीक्षा असल्याने तिलाही गावाबाहेर काढणे गरजेचे होते. शिवाय दिलीप पितांबर गेडाम (५०) यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी बाहेर काढण्याची आवश्यकता होती.

या संदर्भात गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ एसडीआरएफ पथक आणि जिल्हा पोलिसांचे बचाव पथक बोट व आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले.

एडीआरएफचे पोलिस निरीक्षक जी.जे.खोब्रागडे तसेच जिल्हा पोलिस बचाव पथकातील प्रेमानंद टेकाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी समन्वयाने बचाव मोहीम राबवून तिन्ही नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर संबंधितांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुढील प्रवास व वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT