SSC Result Gadchiroli  AI Image
गडचिरोली

SSC Result Gadchiroli | गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८२.१८ टक्के; तीन वर्षांत निकालात घसरण

नागपूर विभागात जिल्हा शेवटच्या क्रमांकावर

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Board Class 10 Result

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (दि.८) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८२.१८ टक्के लागला असून, नागपूर विभागात हा जिल्हा शेवटच्या क्रमांकावर राहिला आहे.

यंदा जिल्हयातून १४ हजार ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ११ हजार ५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८७.०९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७७.४० टक्के एवढे आहे. १३५७ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे.

१२ तालुक्यांपैकी आरमोरी तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८५.२० टक्के लागला असून, त्याखालोखाल अहेरी तालुक्याचा निकाल ८४.९३ टक्के एवढा आहे. देसाईगंज(८३.९९), गडचिरोली(८३.९६), सिरोंचा(७८.६७), एटापल्ली(७७.९७), मुलचेरा(७६.४०) अशी काही तालुक्यांच्या निकालाची आकडेवारी आहे.

तीन वर्षांत निकालात घसरण

मागील तीन वर्षांत जिल्ह्याच्या निकालात घसरण झाल्याचे दिसून येते. २०२४ मध्ये जिल्ह्याचा निकाल ९४.६७ टक्के लागला होता. २०२५ मध्ये त्यात घट होऊन तो ८२.६७ टक्के झाला आणि यंदा त्यात आणखी घसरण होऊन तो ८२.१८ टक्के लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT