मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरमोरी येथे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन दिले. Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | राज्यातील 'त्या' ३९ 'खरात भक्त' आमदारांना निलंबित करा: माकपची मागणी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरमोरी येथे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन दिले

पुढारी वृत्तसेवा

CPIM Maharashtra

गडचिरोली: अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करुन राज्यातील ३९ खरातभक्त आमदारांना निलंबित करावे, या मागणीसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरमोरी येथे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन दिले.

सध्या गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. राज्यकर्त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादाचा पाठपुरावा करण्याऐवजी जाती आणि धर्मावर आधारित द्वेषवादी व अंधश्रद्धायुक्त राजकारणाला बळ दिल्याचा हा परिणाम असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.

अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन तथ्ये समोर येत आहेत. देव, धर्म आणि आध्यात्माच्या आधारे अने महिला व नागरिकांना फसवणारा भोंदू बाबा अशोक खरात आणि त्याच्या सर्व साथीदारांवर कठोर कारवाई करावी,अशोक खरातची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्ध निर्मुलनाच्या कामासाठी उपयोगात आणावी,अंधश्रद्धा व महिलांच्या शोषणाच्या या प्रकरणात ३९ आमदार सामील असल्याचे समोर येत असून त्यांची नावे जाहीर करुन त्यांना तत्काळ निलंबित करावे,

महिलांच्या शोषणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवरुन तातडीने हटवावे, अशोक खरात याच्याबरोबरच इतरही अनेक गावांमध्ये असलेल्या भोंदू बाबांवर कारवाई करावी, राज्य सरकारने राज्यातील सर्व भोंदू बाबांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मुलन कक्षाची स्थापना करून ते कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय त्वरित अमलात आणावा, जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून या कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, समाज माध्यमांद्वारे बाबा-बुवा,ज्योतिषी,मंत्र-तंत्र यांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणावी इत्यादी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार, प्रशांत खोब्रागडे, संजय वाकडे, दशरथ मेश्राम, प्रमोद कोसेकर, रमेश मेश्राम, अर्चना मारकवार, शीला खांडेकर, सपना खोब्रागडे यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT