गडचिरोली

Gadchiroli news: इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसचे पेट्रोल पंपावर आंदोलन

वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

यावेळी माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजित कोवासे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. ऐन शेती हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त असताना देशातील जनतेला महागाईचा सामना करावा लागत असल्याची टीका करत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक नंदू कायरकर, बंडू शनिवारे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, सोशल मीडिया सेलचे प्रदेश सचिव नंदू वाईलकर, जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधव गावळ, दत्तात्रय खरवडे, आदिवासी काँग्रेसच्या सचिव कुसुम आलाम, संजय मेश्राम, अब्दुल पंजवानी, हरबाजी मोरे, कल्पना नंदेश्वर, प्रभाकर वासेकर, विवेक धोंगडे, शालिनी पेंदाम, रीता गोवर्धन, कविता उराडे, मीनल चिमूरकर, शीतल ठवरे, जितेंद्र मुनघाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT