Gadchiroli Student Injustice Protest Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Congress Protest | राहुल गांधी, विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजीत कोवासे यांच्या नेतृत्वात आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Gadchiroli Student Injustice Protest

गडचिरोली: शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, 'नीट' पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व युवकांवरील लाठीमार केला. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आज गडचिरोली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजीत कोवासे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय काँग्रेस पक्ष कदापि खपवून घेणार नाही. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने उत्तर द्यावे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनावर लाठीमार करणे ही लोकशाहीविरोधी बाब असून त्याचा तीव्र निषेध करतो, असे अॅड.कोवासे म्हणाले.

विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत असला, तरी पोलिसांच्या दबावाला आम्ही कधीही घाबरणार नाही.विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सातत्याने संघर्ष करत राहील, असेही कोवासे म्हणाले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थी-युवकांवर झालेल्या कथित लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मनिषा खेवले, नगरसेविका मेघा वरगंटीवार, ज्येष्ठ नेते समशेर खान पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, राष्ट्रीय समन्वयक कुसुम अलाम, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे,

परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, पंचायतराज सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश डोंगरे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विवेक घोंगडे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत धाईत, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, प्रदेश महिला काँग्रेसच्या पुष्पलता कुंमरे, धानोरा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शेवंता हलामी, माधुरी मडावी, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल पंजवाणी, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT