Amita Madavi Protest on Civil Surgeon Gadchiroli  Pudhari
गडचिरोली

Civil Surgeon Gadchiroli | जिल्हा शल्य चिकित्सकांवरील आरोपांची चौकशी करणारी समिती गडचिरोलीत

कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा अमिता मडावी यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Amita Madavi Protest on Civil Surgeon Gadchiroli

गडचिरोली : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी नागपूर येथे आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते. यानंतर चार सदस्यीय समिती आज गडचिरोलीत दाखल झाली आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मडावी यांनी आज (दि.११) पत्रकार परिषदेत दिला.

अमिता मडावी यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयातील रुग्ण भरती केंद्र व कॉल सेंटर दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था तसेच दिव्यांग विभाग स्थलांतरित केल्याने रुग्णांना त्रास होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपध्दतीमुळे अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांनी राजीनामे दिले, असा दावा करीत मडावी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांची चौकशी करुन बदली करावी, अशी मागणी केली.

यासंदर्भात नुकतेच आपण नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर गठित करण्यात आलेली चार सदस्यीय समिती गडचिरोलीत आली आहे. या समितीने निष्पक्ष चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी;अन्यथा ४ सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मडावी यांनी दिला. पत्रकार परिषदेला त्रिवेणी मेश्राम, कोमल भैसारे, प्रेमलता काणेकर, मंगला ब्राम्हणवाडे, माया गेडाम उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT