CITU Protest Gadchiroli Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | सिटू'च्या नेतृत्वाखाली गुरूवारी कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक

पुढारी वृत्तसेवा

CITU Protest Gadchiroli

गडचिरोली: केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली आहे. याअनुषंगाने गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी (दि. १२) 'सिटू' च्या नेतृत्वात कंत्राटी कामगार व शेतकरी मोठे आंदोलन करणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील ५ हजारांहून अधिक कामगार, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार यांनी दिली.

कामगारांवर अन्याय करणाऱ्या चार श्रमसंहिता रद्द करा, असंघटित कामगारांना २६ हजार रुपये वेतन देण्यात यावे, ६० वर्षांवरील सर्व कामगार, शेतकरी, शेतमजुरांना ५ हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यांवे इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन परिचर कामगार व शेतकरी, शेतमजूर यांच्या सर्व संघटना सहभागी होणार आहेत.

या आंदोलनाचे नेतृत्व 'सिटू' संघटनेचे नेते कॉ.रमेशचंद्र दहिवडे, कॉ.जामदार,कॉ.अमोल मारकवार, डॉ.धर्मराज सोरदे, राज बन्सोड हे करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT