आष्टी येथे हजारो स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी कालपासून ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन सुरु Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Farmer Protest | भर पावसातही आष्टीत जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्याचे ठिय्या आंदोलन

हजारो स्त्री-पुरुष शेतकऱ्यांचे सोमवारपासून ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन सुरु

पुढारी वृत्तसेवा

Ashti Land Acquisition

गडचिरोली: प्रस्तावित स्टील उद्योगांकरिता एमआयडीसीमार्फत जमीन अधिग्रहणाच्या विरोधात आष्टी येथे हजारो स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी कालपासून ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. आज भर पावसातही हे आंदोलन सुरुच होते.

सोमवारी दुपारी येनापूर, गणपूर, जयरामपूर आणि मुधोली परिसरातील शेतकऱ्यांनी येनापूर येथे आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी आष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या देत आंदोलन केले. आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरुच होते. संध्याकाळी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.

मात्र, शेतकऱ्यांनी न डगमगता आंदोलन सुरुच ठेवले. शेती आणि जमीन वाचवावी, अशी मागणी आंदोलक करीत आहेत. यापूर्वीही या शेतकऱ्यांनी गडचिरोली आणि चामोर्शी येथे आंदोलन केले होते. परंतु सहपालकमंत्र्यांनी जमीन अधिग्रहणास स्थगिती देत असल्याचे आश्वासन दिल्याने त्यावेळी आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

परंतु पुन्हा शेतकऱ्यांना नोटिसा प्राप्त होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. जमीन अधिग्रहणाविरोधातील आंदोलन तीव्र होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT