राजेंद्र तंगडपल्लीवार  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Crime | गडचिरोलीत खळबळ : आरडी एजंटची निर्घृण हत्या, दुचाकी, मोबाईल, पैसे भरण्याचे मशिन घटनास्थळावरून लंपास

आलापल्लीत पैसे लुटण्याच्या हेतूने खून केल्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

Alapalli RD Agent Murder Case

गडचिरोली : धारदार शस्त्राने आरडी एजंटची निर्घृण हत्या करण्यात आल्याने आलापल्लीत खळबळ माजली आहे. रविंद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (वय ४९, रा.नागेपल्ली) असे मृताचे नाव आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

रविंद्र तंगडपल्लीवार हे आलापल्ली येथील प्रगती पतसंस्थेत आवर्ती ठेव अभिकर्ता म्हणून काम करायचे. १८ जानेवारीला सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ते घराबाहेर पडले. परंतु दुपारपासून त्यांचा मोबाईल बंद होता. संध्याकाळपर्यंत शोध घेऊनही ते सापडले नाही. अखेर कुटुंबीयांनी अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. आज सकाळी आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नागमाता मंदिराजवळ एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे, पोलिस निरीक्षक हर्षल एकरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कुटुंबीयांना बोलावले असता मृतदेह राजेंद्र तंगडपल्लीवार यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दोनशे मीटर आणि आलापल्ली शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ही हत्या करण्यात आली.

राजेंद्र यांचे डोके आणि हातावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. राजेंद्रजवळ यांची मोटारसायकल, मोबाईल आणि पैसे भरण्याची मशिन घटनास्थळी नव्हती. यावरुन पैसे लुटण्याच्या हेतूने राजेंद्रचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, हत्येमागे आणखी दुसरे कारण आहे काय, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ आणि न्यायवैद्यक शास्त्राच्या पथकाला पाचारण करुन पुरावे गोळा केले. शिवाय दोन पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. दरम्यान, आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT