Gadchiroli Accident (Pudhari File Photo)
गडचिरोली

Gadchiroli Accident | स्कार्पिओच्या धडकेत पती ठार, पत्नी जखमी

मोटारसायकलने घराकडे जात असताना अपघात, मुळचे छत्तिसगडचे रहिवासी

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : येथील चामोर्शी मार्गावरील समता नगरसमोर आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास स्कार्पिओने मोटारसायकलला धडक दिली. यात पती जागीच ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाली. हेमंत देवनाथ शेंडे(४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मूळचे छत्तीसगड राज्यातील मानपूर जिल्ह्यातील औंधी येथील रहिवासी असलेले हेमंत शेंडे हे गडचिरोली येथील समता नगरात राहत होते. आज दुपारी ते पत्नीसह मोटारसायकलने घराकडे जात असताना त्यांनी अचानक मोटारसायकल उजव्या बाजूने वळविली. याचवेळी चामोर्शीकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाने मोटारसायकलने धडक दिली. यात हेमंत शेंडे जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. स्कार्पिओ चालक सुधीर भुरले याने मृत हेमंत शेंडे व त्यांच्या पत्नीला आपल्या वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT