गडचिरोली

गडचिरोली : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल

करण शिंदे

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्याविरोधात, आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी भाजप नेते डॉ. नामेदव उसेंडी आणि डॉ. नितीन कोडवते यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. नामदेव उसेंडी आणि डॉ.नितीन कोडवते यांनी गडचिरोली येथील कॉम्प्युटर इन्स्टीट्यूटमधून पत्रके छापून त्यात आपली बदनामी करणारा खोटा मजकूर प्रकाशित केला, अशी तक्रार इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी केली होती. त्यानुसार डॉ. नामदेव उसेंडी व डॉ. नितीन कोडवते यांच्यावर (दि.२४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, तसेच आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर ही घटना घडल्याचे समोर आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT