प्रातिनिधीक छायाचित्र 
गडचिरोली

Gadchiroli News | गडचिरोलीतील ५ व्यक्तींना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने दिला जातो पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पाच व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. २५ आणि २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

मनोहर हेपट, केशव चव्हाण, सूर्यप्रकाश गभने, विजय शेंडे आणि तुळशीराम उंदिरवाडे हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्स्थापना या क्षेत्रांत प्रभावी कार्य केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ आणि रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी १९९८-९९ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीतील पुरस्कारांसाठी राज्यस्तरीय निवड समितीच्या शिफारसींवरून या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील निवड झालेल्या सर्व व्यक्तींचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन मडावी यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT