नक्षलवाद्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. Pudhari Photo
गडचिरोली

गडचिरोली : भामरागडातील नक्षल्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

नक्षलवाद्यावर होते २ लाखांचे बक्षीस जाहीर

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली येथील एका नक्षलवाद्याने पोलिसांसमोर बुधवारी (दि.24) आत्मसमर्पण केले. तो नक्षलवादी भामरागड दलमचा सदस्य होता. लच्चू करिया ताडो (वय.45) असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्याचे नाव आहे. याच्यावर राज्यसरकारने 2 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते.

ताडो हा भामरागड तालुक्यातील भटपार येथील रहिवासी आहे. 2012-13 पासून तो गावात राहून जनमिलिशिया म्हणून नक्षल्यांना राशन आणून देणे, नक्षल्यांची शस्त्रे लपवून ठेवणे, पोलिसांची माहिती नक्षल्यांना देणे अशाप्रकारची कामे करीत होता. गतवर्षी तो भामरागड दलमचा सदस्य झाला. त्याच्यावर जाळपोळ आणि जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. 2022 मध्ये इरपनार गावाजवळच्या रस्त्यावर नक्षल्यांनी 19 वाहनांची जाळपोळ केली होती. त्यात लच्चूचा प्रत्यक्ष सहभाग होता. या शिवाय 2023 मध्ये नेलगुंडा गावाजवळच्या जंगलात स्फोटके पुरुन ठेवण्यातही तो सहभागी होता.

राज्य सरकारने आत्मसमर्पण योजना सुरु केल्यापासून आतापर्यंत 670 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. तसेच २०२२ ते २०२४ या कालावधीत २२ नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे, असे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT