Maharashtra Assembly Poll
गडचिरोलीत ६९.६३ टक्के मतदान झाले. File Photo
गडचिरोली

गडचिरोलीत ६९.६३ टक्के मतदान

Maharashtra Assembly Election| कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीन मतदारसंघांमध्ये आज (दि.२०) सरासरी ६९.६३ टक्के मतदान झाले. यावेळी सर्वत्र तगडा पोलिस बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही.

आज सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. सकाळपासूनच शहरी आणि ग्रामीण भागातही नागरिकांनी मतदानासाठी उत्साह दाखवला. दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची वेळ होती. या वेळेपर्यंत आरमोरी मतदारसंघात ७१.२६ टक्के, गडचिरोलीत ६९.२२ तर अहेरी मतदारसंघात ६८.४३ टक्के मतदान झाले. तिन्ही मतदारसंघात सरासरी ६९.६३ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. सर्व ठिकाणची मतदान पथके मुख्यालयी परत आल्यानंतर अंतिम आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.