परसबाग स्पर्धेत बांग्ला प्राथमिक शाळा राज्यात प्रथम Pudhari Photo
गडचिरोली

बांग्ला प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक

करण शिंदे

गडचिरोली : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता घेण्याकरीता स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. रविवारी (दि.२९) सप्टेंबरला पुणे येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करुन त्यातून उत्पादित भाजीपाला आणि इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने शाळेत परसबाग निर्माण करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक वाढली असून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळत आहे. शिवाय ताज्या भाजीपाल्यामुळे पौष्टीक आहार मिळत असल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती सुदृढ होण्यास मदत होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांना द्वितीय क्रमांक, सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील आंबडपाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. वर्धेच्या आष्टी तालुक्यातील लिंगापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोल्हापूरच्या चांदगड तालुक्यातील मळवी येथील विद्यामंदिर व बीडच्या पाटोदा तालुक्यातील झरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शांळांना प्रोत्साहनपर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT