12 Maoists killed in Gadchiroli
गडचिरोलीमध्ये पोलिस आणि माओवादींमध्ये चकमक Pudhari Photo
गडचिरोली

गडचिरोलीत १२ माओवाद्यांना कंठस्नान; घातक शस्त्रास्त्रे जप्त, कमांडोना राज्याकडून ५१ लाखांचे बक्षिस

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : बुधावरी (दि.17) सकाळी गडचिरोलीमध्ये पोलिस आणि माओवादी यांच्यामध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत गडचिरोली पोलिसांना 12 माओवाद्यांचा खात्मा केला आहे. दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत 6 तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता. परिसरात केलेल्या शोधामुळे आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

गडचिरोली येथून सकाळी एक ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. ज्यामध्ये सी-60 दल वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळ पाठवण्यात आले होते. इंटला गावाजवळ 12-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची पक्की माहिती पोलिसांना माहिती होती. चकमकीनंतर आतापर्यंत 3 एके 47, 2 इन्सास, 1 कार्बाइन, 1 एसएलआर यासह 7 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम, टिपागड दलमचे प्रभारी हे मृत माओवाद्यांपैकी एक असल्याची ओळख पटली आहे. माओवाद्यांची पुढील ओळख आणि परिसरातील शोध सध्या सुरू आहे.

राज्य शासनाकडून कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाखांचे बक्षिस जाहीर

या चकमकीत सी- 60 दलाचा एक पोलिस उप निरिक्षक आणि एक जवान यामध्ये जखमी झाले आहे. ते धोक्याबाहेर असून आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे. या ऑपरेशननंतर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री गडचिरोली देवेंद्र फडणवीस यांनी वरील यशस्वी ऑपरेशनसाठी सी-60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे

SCROLL FOR NEXT