विदर्भ

राजूरा गोळीबार प्रकरण : शेजाऱ्याच्या जीव वाचविण्याच्या प्रयत्नात डोहेंच्या पत्नीचा बळी! आरोपींना अटक

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून रविवारी (दि. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन आरोपींनी राजूरा शहरातील भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीवर गोळीबार करुन ठार केल्याची घटना घडली. या घटनेत शेजारी शेरगील हे स्वत:चा जीव वाचविण्याकरिता सचिन डोहे यांच्या घरात शिरले. त्यांच्यावर होत असलेला गोळीबारात डोहे यांच्या पत्नीचा जीव गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना रविवारी (दि. २४) रात्री साडेनऊच्या सुमारास राजूरा शहरातील सोमनाथपूरा वार्डात घडली. या घटनेत नवज्योत सिंग व एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूरा शहरातील सोमनाथपूरा वार्डातील फिर्यादी लल्ली शेरगील व भाजयुमोचे सचिन डोहे हे शेजारी आहेत. दोन वर्षापूर्वी लल्ली शेरगील याने आरोपी नवज्योत सिंग यांच्या भावाला मारहाण केली होती. तेव्हापासून मारेकरी फिर्यादीला आकसातून पाहत होता. रविवारी (दि. २४) रात्री साडेनऊच्या सुमारास लल्ली शेरगील हा घरी असताना दोन मारेकऱ्यांनी त्याच्या घरी जावून गावठी बनावटीच्या पिस्तुल मधून गोळी झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने कसाबसा जीव वाचवित पळ काढला. शेजारील सचिन डोहे यांचे घरी आश्रय घेतला. पळून जात असताना मारेकऱ्याने त्याचेवर गोळीबार केला. यामध्ये तो जखमी झाला. गोळीबाराच्या आवाजाने सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा यांनी दरवाजा उघडला. मारेकऱ्यांनी शेरगीलवर झाडलेली गोळी दरवाजा उघडताच क्षणी पूर्वशा हिला लागली. फिर्यादी जीव वाचविण्याकरीता खाली बसल्याने तो बचावला. जागीच पूर्वशा यांचा मृत्यू झाला.

या घटनेतील गावठी पिस्तुलामध्ये ५ गोळ्या होत्या. यातील आरोपीने चार राउंड झाडले. यापैकी एक गोळी मृत महिलेला व एक गोळी जखमी फिर्यादीला लागली. फिर्यादीने स्वत:चा जिव वाचविण्याच्या प्रयत्नात डोहे यांची निरपराध पत्नी यांचा बळी गेला. या घटनेनंतर डोहे यांच्या यांची दोन मुले यातील एक मुलगा व एक छोटी मुलगी हे आईपासून पोरकी झाली आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर घटनेची माहिती राजूरा पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपींचा शोध घेतला. परंतु मारेकरी हाती लागले नाहीत. उप पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांना माहिती होताच त्यांनी, पूरपरिस्थिती असतानाही रात्रीच रेल्वेने राजूरा पोलीस स्टेशन गाठले. गोळीबारात जखमी झालेल्या शेरगीलला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यानंतर आरोपींच्या शोधाकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी खुशाल नागरगोजे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र जोशी, ओमप्रकाश मेश्राम, सदानंद वडतकर यांचे तीन पथक नेमण्यात आले. पोलिस शिपाई तिरूपती जाधव, खुशाल टेकाम, राम बिंगेवार, महेश कोंढावार, शेखर माथनकर यांच्या पथकाने रात्रीच दोन्ही आरोपींना अटक केली. त्यामध्ये 20 वर्षीय नवज्योत सिंग व एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. आरोपींना भादंवीचे 302, 307, 34 मंबई पोलिस कायदा 135, हत्यार कायदा 3,25 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT