विदर्भ

गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटींचा नवा लोहप्रकल्प होणार : देवेंद्र फडणवीस

backup backup

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. १५) एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील पोलीस ठाण्याची नवीन प्रशासकीय इमारत आणि शिपायांच्या निवासस्थानांचे लोकार्पण करण्यात आले.

आपण मुख्यमंत्री असताना सुरजागड प्रकल्पाची सुरुवात झाली. शिवाय कोनसरी येथील लोहप्रकल्पाचे भूमिपूजनही झाले होते. आता तेथे २० हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प होणार असून, सुमारे ३० हजार नागरिकांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होईल. लोहखनिज वाहतुकीसाठी लोहखाण पट्टा (मायनिंग कोरिडोर) प्रस्तावित असून त्यास महिनाभरात मंजुरी देण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस नक्षल्यांशी शौर्याने लढत असून, नक्षलवाद बऱ्याच अंशी कमी झाला आहे. यामुळेच राष्ट्रपतींचे पोलीस शौर्यपदक गडचिरोली पोलिसांना मिळाले आहेत. सरकार पोलिसांच्या पाठीशी असून, त्यांना काहीही कमी पडू देणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,खासदार अशोक नेते, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

पिपली बुर्गी येथील इमारत आणि पुलाचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी येथील पोलीस मदत केंद्राच्या नवीन इमारतीचे आणि कोठी-कोयणार या पुलाचे लोकार्पण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT