चंद्रपूर

चंद्रपूर : अठ्ठेचाळीस तासानंतर कोलारा ग्राम पंचायतीचा कुलूप !

backup backup

 चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोन मधील चिमूर तालुक्यातील कोलारा (तुकूम) गावातील नागरिकांनी सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्राम पंचायतीला ठोकलेला कुलूप आज मंगळवारी साडेपाचच्या सुमारास तब्बल अठ्ठेचाळीस तासानंतर चोख पोलिस बंदोबस्तात उघडण्यात आला. मात्र नागरिकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत ग्रा. प. पदाधिकारी कार्यालयात जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राष्ट्रीय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील कोलारा (तुकूम) गावातील नागरिकांनी विद्यमान सरपंच स्थानिक समस्या सोडविण्याकरीता दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी रविवारी रारत्री साडेदहाच्या सुमारास ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले होते. शिवाय ग्रामपंचायत बरखास्त करावी याकरीता मागणी रेटून धरली होती. अनेक वर्षापासून कोलारा गावातील प्रवेशद्वारातून कोअर व बफर झोन मध्ये पर्यटन सफारी सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांना जिप्सी चालक, मालक, गाईड व अन्य मार्गाने रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच कोअरझोनमध्ये अनेक कुटूंबांची शेती असल्यामुळे अनेक निर्बंध आले आहेत. शिवाय वन्यप्राण्यांचा हैदोस असल्याने दरवर्षी पिकांची मोठी नासाडी होत असते. आदी विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच सध्या गावात असलेले कोलारा कोअर क्षेत्र प्रवेशद्वार वनविभागाने फायर लाईनकडे उभारावे अशी जुणी मागणी आहे. परंतु याकडे सरपंच सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये रोष उ फाळून आला. आणि रविवारी संतप्त नागरिकांनी रात्री साडेदहाच्या ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकला.

सोमवारी चिमूर पोलिस व पंचायत समिती प्रशासनाला माहिती कुलूप ठोकल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी कोलारा गावात जावून परिस्थिती लक्षात घेतली. ग्राम पंचायत पदाधिकारी व नागरिकांशी संवाद संवाद साधला. नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आल्यामुळे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. पंचायत समिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संतप्त नागरिकांचा रोष बघता याकडे दुर्लक्ष केले.

आज मंगळवारी गट विकास अधिकारी यांनी, शासकिय कार्यालयाला कुलूप ठोकता येत नाही तसेच बंद ठेवता येत नाही. त्यामुळे कार्यालय सुरू करावे असे निर्देश दिल्यानंतर पोलिस बंदोबस्तात आज सायंकाळी साडेपाच वाजता चिमूरचे ठाणेदार मनोज गभने, सचिव ठाकरे, ग्राम पंचायत कर्मचारी तसेच दंगा नियंत्रण पथकाच्या उपस्थितीत तब्बलअठ्ठेचाळीस तासानंतर ग्राम पंचायत कार्यालयाचा कुलूप उघडण्यात आला.मागण्या मान्यहोईपर्यंत ग्राम पंचायत पदाधिकारी कार्यालयात जाणार नाही.

पंचायत समितीच्या निर्देशानंतर प्रशासकी कार्यवाही करून कोलारा (तुकूम) ग्राम पंचायतीला लावलेला कुलूप आज मंगळवारी सायंकाळी उघडण्यात आला आहे. मात्र ग्राम पंचयतीचे पदाधिकारी हे नागरिकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याशिवाय ग्राम पंचायतीमध्ये जाणार नाही असा निर्णय ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यां पूर्ण करण्यासाठी एका विशेष ग्राम सभेची आयेाजन केले जाणार आहे. त्यामध्ये मागण्यांवर चर्चा करूण सोडविण्यासाठी प्रयतन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT