चंद्रपूर : नागपूरमधील इरई मल्टीफिट या जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.16) सकाळी घडली. तरुणाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटका झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रोहित जालान असे (वय.50) मृत तरुणाचे नाव आहे. जिममध्ये रोहित व्यायामादरम्यान कोसळल्याने त्याला उपस्थित नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.