Warora Fire Incident pudhari
चंद्रपूर

Warora Fire Incident: वरोऱ्यात मध्यरात्री लाडली शोरूमला आग; सतर्कतेमुळे मोठे नुकसान टळले

Anirudha Sankpal

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

वरोरा शहरातील प्रसिद्ध लाडली शोरूममध्ये रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. लाडली मॉलचे मालक गुट्टू मालू यांच्या शोरूममध्ये कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आग पसरल्यास मोठ्या वित्तहानीची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सामाजिक कार्यकर्ते, नगर परिषद पदाधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठे नुकसान टळले.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास शोरूममध्ये अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. कपड्यांचा मोठा साठा असल्याने आग वेगाने पसरण्याची भीती होती. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आशिष ठाकरे आणि वरोरा नगर परिषदेचे भूषण सालवटकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. स्थानिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

काही वेळात अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली. जवान रवि बरसे, नीलेश तवाडे आणि बादल गज्जलवार यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे शोरूममधील लाखो रुपयांचा कपड्यांचा साठा आणि इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचवण्यात यश आले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मध्यरात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेत वेळेवर मदत आणि अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. संकटाच्या वेळी धाडस व समयसूचकता दाखवणाऱ्या आशिष ठाकरे, भूषण सालवटकर आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे शहरातील नागरिक व व्यापारी वर्गाकडून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT