चंद्रपूर

मुनगंटीवार यांची काँग्रेसवर टीका; व्हिडिओ व्हायरल

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या निवडणूक प्रचारासाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात जाहीर सभा झाली. पंतप्रधान मोदी यांचे मंचावर आगमन होण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण झाले. यावेळी मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करीत काँग्रेस व त्यांच्या नीतीचा उदाहरण देत खरपूस समाचार घेतला. भाषणात त्यांनी काही शब्द आणि वाक्ये वापरले. मुनगंटीवार यांच्या भाषणाची ती  क्लिप ज्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्याच वेगाने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

काँग्रेसच्या हुकूमशाही विरुद्ध बोलत राहणार

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट व टीकेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी,काँग्रेसच्या या दुष्टचक्राला आपण घाबरत नसून काँग्रेसच्या हुकूमशाही विरोधात याच पद्धतीने बोलत राहणार असल्याचे स्पष्टीकरण फेसबुक पेजवर दिले आहे. जेव्हा लोकांना 1984 मधील दंगलीतील अत्याचाराची आठवण येते तेव्हा खूप चीड येते. आपल्या भाषणाची अर्धवट क्लिप व्हायरल करून काँग्रेसने जनतेवर केलेला अन्याय आणि अत्याचार लोक लपवू शकणार नाहीत.1984 च्या दंगलीत असा अत्याचार झाला नव्हता, याचे उत्तर कोणताही काँग्रेस नेता अभिमानाने देऊ शकत नाही. काँग्रेसच्या हुकूमशाही कारभाराविरोधात नेहमीच बोलणार,असे मुनगंटीवार यांनी त्यात नमूद केले आहे.

नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार

आणीबाणी मोदींनी लावली का.?काँग्रेसच्या त्या काळात माझे वडील व देवेंद्र फडणवीस यांचे पिता 19 जेल मध्ये होते. त्यांचा दोष भारतमाता की जय म्हणणे होता.,काँग्रेसने1984 च्या दंगलीत पतीच्या नजरेसमोर पत्नीला जळत्या ट्रकमध्ये टाकलं चार वर्षाच्या शिख मुलासमोर त्याच्या वडिलांना जळत्या ट्रक मध्ये टाकलं ते आता हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचं युद्ध लढत आहेत.सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एकाच खाटेवर झोपायला लावणारे काँग्रेसवाले,देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करणारे काँग्रेसवाले,अफजल गुरूला फाशी नका देऊ म्हणणारे काँग्रेसवाले,तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेसवाले बोर्डावर लिहितात 'हुकूमशाही विरुद्ध लोकशाही',?हुकूमशाही तुमची(काँग्रेस)आहे.लोकशाही बघायची असेल तर,जनसागराकडे बघा.हा जनसागर साक्षी आहे,लोकशाही म्हणजे काय असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT